बहाणा
बहाणा
पावसात जायचं मस्त भिजायचं...
भिजायचं कमी नि रडायचं जास्त,
भिजायची साली गंमत असते,
डोळ्यातलं पाणी कुणी पाहायची,
मुळी चिंताच नसते...
साला दरवर्षी असंच होतं
बाहेर आभाळ भरून येतं, आत आठवणी...
मग, अस्वस्थ होतो, सरळ बाहेर पडतो...
चिंब होण्यासाठी,
आकंठ भिजत राहतो, नखशिखांत...
पाऊस, बरसत राहतो...
आतही, अन् बाहेरही...
भिजणं, फक्त बहाणा आहे...