बेफिकीर
बेफिकीर
आज होऊया बेफिकीर
थोडे एकमेकात रमुया
स्वच्छंदी या सायंकाळी
थोडे एकांतात फिरुया ||
नाव कशाला नात्याला
नाते आपले विश्वासाचे
अबोल्यातही दिसून येते
डोळ्यामधूनी भाव प्रेमाचे ||
उदासिनता माझ्या मनाची
शोधत राहते आतुरतेने
मिळतो ओलावा प्रेमाचा
तुझ्या कवेत तृप्ततेने ||
नको समजूस हळवी
आहे कठोर थोडीशी
तुझ्याच स्पर्शाने होते
वितळलेली मेणबत्ती जशी ||
दिवस खूप लोटले
क्षण आला भाग्याचा
चल होऊनी बेफिकीर
सडा पडूदे प्रेमाचा ||