STORYMIRROR

Meenaxi Ade

Inspirational

3  

Meenaxi Ade

Inspirational

बेईमान

बेईमान

1 min
14.3K


हसून जसे जगत गेलो जे समोर आले

 जे सरत आले ते आयुष्य बेईमान झाले।।

सतत कष्टाने पुसली हातावरील रेषा

आता विचारु कुणा नशीब बेईमान झाले।।

मी जागलो वचनाला भावनेत जरी दिले

बाकी तुम्ही जे दिले ते शब्द बेईमान झाले।।

मी डाव खेळताना घेतले दान जे पडले

तुमच्या हाती खेळता फासे बेईमान झाले।।

आता कशाचा हा हिशोब कुणासाठी मांडू मी

निर्जीव कोरडे ते आकडे बेईमान झाले।।

मनातल्या या भावना गुंफल्या तुमच्यासाठी

दाद देण्यास काय हो मित्र बेईमान झाले।।

 हवे होते काय मिळाले काय काही कळेना

अधूरे राहिलेले ते स्वप्न बेईमान झाले।।

सगळे नव्हे अपूरे सुखाचे क्षणही होते

आठवी दुःख च ते स्मरण बेईमान झाले।।

आता जगावे फक्त आपल्याच मनासारखे

तक्रार का मी करु की सारे बेईमान झाले।।


Rate this content
Log in

More marathi poem from Meenaxi Ade

Similar marathi poem from Inspirational