STORYMIRROR

Arun Gode

Action

3  

Arun Gode

Action

बैल

बैल

1 min
270

सतत राबणारा शेती मित्र 

ज्याचे डोळ्यात उभे सारखे चित्र

शेती उद्दोगाचे महत्वपूर्ण पात्र

तोच बैल खरा शेतक-याचा मित्र


उन्हा-तान्हात घेत असतो सारखे कष्ट

शेतक-याच्या घामाचे जाणतो महत्व

अन्न- धाण्यातच खरे पोष्टिक सत्व

मानवी शरिराला त्याचेच आहे महत्व


ज्वारीच्या भाकरीला असते चव चविष्ट

कांदा –भाकर सकाळची नाहरी स्वादिष्ट

सरकी -कडबा –ढेपने होते बैल धष्ट-पुष्ट

याच्याच उर्जाने बैल करतो शेतात कष्ट


बैल-शेतक-याचा संबंध आजीवन अटूट

बिना बैलाची शेती नुसती कबाड-कष्ट

हीच जोडी साध्य करते आर्थीक उदिष्ट

देशाचे आर्थीक चक्र चालवते सुसाट


शेतात राबणारा एक्मात्र प्राणी बैल

त्याच्या सोबतचा शेतकरी पन बैल

जर झाली यांची रेश्मीगाठ सैल

सरकारी आर्थीक दावे होणार फोल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action