बापू शेवट्च्या श्वासापर्यंत तुमची लढाई आम्ही
बापू शेवट्च्या श्वासापर्यंत तुमची लढाई आम्ही
बापू आता तुम्हाला आम्ही केव्हाच केले हद्द्पार
कारभारी नाईलाजानं घेतात नाव तुमचं कामापुरतेच
सत्य अहिंसा सत्याग्रह मूलमंत्र ठरतोय वेडेपणा
तुम्ही उरलात आता ऑफिसात नोटापुरतेच
काळ बदललाय तसा माणूस आणि कारभारही
आता बापालाही बाप न म्हणणारी निर्ढावलेली जमात
कुठे समजणार तुमचे कार्य विचार आचारसंहिता ?
त्यांनी तर तुमच्या बदनामीचा ठेकाच घेतला जणू
जगभर तुमचे विचार पसरले आम्ही मात्र गुंडाळून ठेवलेत
गरज असेल तरच उदो उदो तुमचा अपरिहार्यता म्हणून
बाकी तुमचा तिरस्कार कमी झाला ना तुमचे मारेकरी
दिवसेदिवस वाढत चाललंय ऐऱ्या गैऱ्याच नथ्थु खैऱ्याच प्रस्थ
बापू कुणी काही केलं तरी तुमचे विचार संपणार ना तुम्ही
तुमच्या विचाराचा वारसा वाहताहेत सक्षम खंबीरतेने
अंगिकारली आम्ही सत्य अहिंसा सत्याग्रहाची खडतर वाट
लढत राहू बापू शेवट्यच्या श्वासापर्यंत तुमची लढाई आम्ही ....
