पुन्हा नवा जुमला
पुन्हा नवा जुमला
बारमाही अठरा तास गाळून घाम आमच्या पं.प्र .नी आणला जुमला ताजातवाना कमाल रे कमालरेटून हाणला बघा चांगला ...
दवंडी पिटून दिनरात झटून आमच्या पं.प्र .नी आणला एक जुमला जे जे वांछील ते ते लाहो प्राणिजात नुसतं म्हणायला आपलं काय जात ?
आमच्या पं.प्र .नी आणला पुन्हा एक जुमला आणू म्हटलं काळधन परदेशी घबाड पंधरा लाखांत होतील गड्या सगळेच लाल कशाचं काय नि फाटक्यात पाय आता वाट पहाय
आमच्या पं.प्र .नी आणला पुन्हा एकेक जुमला सबका का साथ सबका विश्वास हमारा विकास आटा कशाला घ्या की फ्री डाटा व्हा उपडेटबघत बसा तमाशा आम्ही दाखवू तो गपगुमान
आमच्या पं.प्र .नी आणला पुन्हा नवा जुमला आता लढाई धर्मासाठी जातीची अन मातीची नोकरी नको नको कामधंदा साहेबासाठी कायपण उडत गेली लोकशाही आता तुम्हीच आमचे विश्व्गुरू
आमच्या पं.प्र .नी आणला पुन्हा नवा जुमला आत्ता आपलाच जगभर वाजतोय डंका आपल्याकडे हाय गड्यानो वाशिंग मशीन ईडी सीडीतून हमखास सुटका सर्व गुन्हे माफ
आमच्या पं.प्र .नी आणला पुन्हा नवा जुमलाना कोई घूसा हैं ना कोई फसा हैं आले बघा काळेधन झाला तुमचा उद्धारधर्म जातीच्या नशेत बेधुंद होऊन बिनधास्त जगा
