*** बाप ***
*** बाप ***
सोपं नसतं हो कुटुंबाचा बाप होणं
चेहऱ्यावर हास्य ठेवून परिस्थितीचं ओझं वाहणं!
गरजा पूर्ण करण्यातच
आयुष्य त्याचे सरते
कधी लाईट, फोनची बिले तर
कधी होमलोनचे हप्ते !
आयुष्य मुलांसाठी झिजवून सुद्धा
कोरीच त्याच्या नशिबाची डायरी
म्हणून तर पहावी लागते त्याला
कधीतरी त्या वृद्धाश्रमाची पायरी !
मोठया अभिमानाने म्हणतो
आपण बाप हा बाप असतो कारण
आई जरी प्रेमाचं प्रतीक असली तरी
बाप हा सर्वोच्चतेचं प्रमाण असतो !