बाप
बाप
शेतात बाप माझा आहे उन्हात बसला
थांबून सावलीला सुचतोय शेर मजला
सुख सांगण्या जगाला 'तो' नेहमी उताविळ
दुःखास बोलतांना त्याचाच शब्द रुसला
'तो' राबतो असा की होतेच रक्त पाणी..
वाटेलही उन्हाला 'तो' पावसात भिजला
ना ओढतो पिठावर तो रेघ आयत्या त्या..
कर्मास न्याय देण्या 'तो' एकटाच धजला
'तो' सांगतो कहाणी हंगाम संपल्यावर..
कर्जात कोणत्या अन् आहे कितीक फसला
मरणोपरांत 'त्याच्या' हे सत्य जाणिले मी..
माझे भविष्य घडण्या 'तो' भूतकाळ झिजला!
ठेवा जपून वाकळ घामेजली सुगंधी..
भासेल 'तो' उशाशी आहे अजून निजला
