बालपण
बालपण
प्रत्येक बालपण फुलासारखे..
कळी उमलावी नी हसू यावे ..
भरून रंग उडावे फुलपाखराचे..
कौतुक निरागस हट्टाचे..
आकाशातील पतंगामागे ईर्षेने धावणारे..
काजव्यांचे दिवे डोळयांत चमकणारे..
पाण्यावर तंरगण्या-या कागदी..पण,
साहसी मनाच्या बोटीसारखे..
गर्द रानाईत लपतांना,
लख्ख किरणांना शोधणारे...
हात रीकामा असतांनाही,
जग मुठीत घेऊन मिरवणारे..
विस्तीर्ण नभाखाली झोपतांना,
लुकलुणा-या चादंण्यांची गोष्ट ऐकणारे..
पर्वा कशाचीच न असणारे,
जोशाने पुढे जातांना ..न थांबणारे..
थकलेच तर मायेच्या पदरात बिलगणारे..
असे ते बालपण सा-यांचे..
नेहमीच गोड आठवणींत रमणारे..
मोठेपण हवेसे वाटणारे..
पण तरी लहाणपणात जगणारे..