नाते..तुझे नी माझे.
नाते..तुझे नी माझे.
हृदयाचे नाते जुळून आले..
मन माझे नकळत तुझे झाले..
अशी काय व्हावी जादुगरी,
न समजे माझ्या मनाला..
सगळीकडे का भास होई तुझा,
वेडी म्हणे मी स्वतःला..
जीव जड़ला तुझ्यातं,
असेच झाले का,तुलापण?..
मनवते मी माझ्या मनाला,
हो..मन तुझे शोधी मलापण..
करू प्रेम जीवापाडं,
ठेऊन भान एकमेकांचे..
असे ना कधी मनात यावे,
दुखावले मन आपण कुणाचे..
जीवलगा तु माझा झाला,
असे नेहमी वाटे मला..
हातांच्या हया रेखांमध्ये,
नाव फक्त तूझे दिसे मला..

