बाजार
बाजार
पैशात माणसांचा व्यापार पाहिला मी
टाकून मान खाली बाजार पाहिला मी
काहीच भाव नाही कांद्यास आज माझ्या
सोन्यात मोजतांना भंगार पाहिला मी
सूर्यास्त आज माझा पूर्वेस होत आहे
स्वप्नातल्या सकाळी अंधार पाहिला मी
आली जगात आता भलतीच लोकशाही
जिंकून हारलेला मतदार पाहिला मी
झालाय खेळ सारा स्वस्तात भावनांचा
डोळ्यात वेदनांचा दरबार पाहिला मी
