STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

बाजार

बाजार

1 min
231

बाजार भावनांचा रस्त्यात मांडलेला

आकांत आसवांचा डोळ्यात साठलेला


खेळात वासनेच्या देहास वाटते मी

पोटात भाकरीचा आक्रोश वाढलेला


आधार जीवनाचा शोधू कुठे कळेना

आभाळ फाटलेले अंधार दाटलेला


तू सांग भाव आता जो तो मला विचारी

व्यापार माणसांचा स्वस्तात चाललेला


प्रेमात वेड लागे काही उजागरांना

संसार बायकोशी अर्ध्यात फाटलेला


मोठा रुबाब आहे श्रीमंत माणसांचा

प्रेमांध वासनांनी सर्वांग  पेटलेला


प्रेमास कोणते देऊ नाव आज खोटे

‘लैला’ म्हणून बोले प्रत्येक भेटलेला 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy