बाजार
बाजार
बोलायला आता तसे, फारस काही उरल नाही,
तुझ्या मनातही "माप" आहे, जे कधी दिसल नाही.
उगाच समज झाला माझा, तुला "वेगळा" समजण्याचा
तुझ्यातही तो "समाज" आहे, जो कधी दिसला नाही.
मला काय वाटते,याची आता खंत कशाला
तुझ्या मनाला कधी, " पाझर" फुटलाच नाही.
शेवटी हा "बाजार" सगळा, "भाव" तर लागणार झाला
तुझ्यात जीव गुंतला जरी, जीव तुझा तुटणार नाही.
सोड आता सारे बहाने, मनावरी भार कशाला
आयुष्याचा प्रश्न हा, "मतितार्थ" तुला कळलाच नाही.
"गिरव" नव्याने पाढे जुने, पुरुषांना मन असतच कुठे?
जिवास जीव देणारी "स्त्री" ती अबलाच, तिच्या प्रेमाची शक्ति तुला कळलीच नाही.
