STORYMIRROR

Sarika Bansode

Romance Tragedy

4  

Sarika Bansode

Romance Tragedy

कोरडे पावसाळे

कोरडे पावसाळे

1 min
191

सारेच पावसाळे, कोरडे निघून गेले

आठवीता तुला मुक्याने, का डोळे झाले ओले?


सांगू कशी तुला मी, हुरहुर या मनातली

तुझ्यात जीव वेडा, माझीतरी कुठे मी 

आठवणीत ओठी हसू, डोळ्यात पाणी दाटले ले 

सारेच पावसाळे, कोरडे निघून गेले

आठवीता तुला मुक्याने, का डोळे झाले ओले?


लोटते मी दिस सारे, जाईल जिंदगी ही 

जिवंत देह जरी, आत्मा रुसून गेली 

पेटवूनी मी सुखाला, मरना ला जवळ केले 

सारेच पावसाळे, कोरडे निघून गेले

आठवीता तुला मुक्याने, का डोळे झाले ओले?


जावू दे आता सरले,जगायाचे दिस माझे 

मी रात्र काळोखाची, तू स्वप्नं पहाटेचे

विरहात आता फक्त, झुरणेच राहिलेले 

सारेच पावसाळे, कोरडे निघून गेले

आठवीता तुला मुक्याने, का डोळे झाले ओले?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance