Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Romance

3  

Prashant Shinde

Romance

असतो तो, हवा तिथे...!

असतो तो, हवा तिथे...!

1 min
150


असतो तो

हवा तिथे..!

मस्त मजा असते

जेव्हा

हृदयात तिच्या

आपले स्थान असते...


वाटतं कधी कधी

प्रेम म्हणजे सजा असते

पण

दिसतं तसं कधीच नसतं

तिथंही थोडं सुख असतं...


सफल विफल

नियतीचा खेळ सारा

गप्पा प्रेमाच्या कितीही मारा

वाहतोच ना

कधी कधी उलट वारा....


अढळ स्थानाचं मोल

फार फार मोठं असतं

ज्याला लाभतं

त्यालाच ते

चांगलं कळतं...


कोणाच्या तरी

हृदयात आपण सदैव आहोत

ही भावनाच

खरं प्रेम असतं

म्हणून सारं सारं पटतं...


आणि

मन म्हणतं

कोणीतरी आहे

जिथे मी सदैव आहे

जशी ती सदैव आहे...


या असण्याने जीवन सरतं

एवढं सौख्य जन्मभर पुरतं

कितीही वाटलं

तरी थोडं उरतं

जे फक्त आपल्यासाठीच असतं....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance