आवेग
आवेग
1 min
375
खोल श्वासात चमकली बिजली
तुझा मंत्रमुग्ध स्पर्श होता
वायूवेगात घेत गिरकी
रोखला श्वास तुला मिठीत घेता॥१॥
आवेग नसे आवरणारा
रोम रोम तळमळलेले
तुझ्यात एकवटून जाण्या
नजरेने होते कळवळलेले॥२॥
बांध फुटला नजर झुकली
शब्दांची तर जागा चुकली
प्रेमाच्या डोहात बुडता
देहाची तर तहान मुकली ॥३॥
तिला कवेत घेता घेता
एकरुप झालो कधी
अंकात बुडून घेत स्वतःला
श्वास विसावले न कळे कधी ॥४॥
तिच्या बटात गुंतले हात
एक सुस्कारा विश्वासाचा
समाधान डोळ्यात विसावले
दोघात जोश तो आनंदाचा ॥५॥
मुक्त भावनांचा पाऊस होता
चिंब चिंब दोघे भिजले
एकमेकांच्या बाहूपाशात
निवांत होते ते निजले॥६॥