अष्टांगीक ज्ञानमार्ग
अष्टांगीक ज्ञानमार्ग
स्वतःला शांत ठेवू पहात असतांना...
होते पडझड काही क्षण कधीकधी अन अनूभवावे लागतात काही क्षण..
काहीशे अस्थिर-अस्वस्थ श्वास..
अनिश्चिततेच्या अनावश्यक चितेंच्या गर्तेत
जात असतो माणूस..गुरफटत
हळूहळू खोल दलदलीत
महाकाय हत्तीही रूतत जावा तसाच.
सिद्दार्था तू दिलेला अष्टांगीक ज्ञानमार्ग
अश्यावेळी अनुसरतो मी....अन
मनावर साचलेलं अज्ञान अंधकाररूपी मळभ हळूहळू पडू लागतं गळून..
तथागता स्वंयप्रकाषित होण्याचं ध्येय
ऊराशी बाळगतो मी....
तुझ्या अद्वीतीय बुद्ध तत्वातील
एक कण जरी होऊ शकलो तरी
माझ्या माणव जीवनाचे सार्थक होईल.
