STORYMIRROR

SATISH KAMBLE

Tragedy

4  

SATISH KAMBLE

Tragedy

अर्थ बदलला प्रितीचा

अर्थ बदलला प्रितीचा

1 min
348

काळजी त्याने घेतली माझी

घेतला मनाचा ठाव,

सहानुभूती ती होती खोटी

होता तो त्याचा डाव


हळूहळू मन जिंकुनी माझे

झाला तो माझा सखा,

कधीच वाटले नाही की तो

देईल मजला धोका


क्षणाक्षणाला षडयंत्राचे

बीज पेरले त्याने,

कळू दिले ना कधीही मजला

त्याच्या कुटील ज्ञानाने


प्रेमभाव तो त्याचा पाहूनी

मोहित झाले होते मी,

दुष्ट चेहरा कधीच त्याचा

टिपला ना या नयनांनी


क्षणात अचानक घात करूनी

मन हे माझे तोडले त्याने,

अजोड त्या माझ्या प्रितीचे

खोटे पडले होते नाणे


सहन होईना धक्का मजला

या विश्वासघाताचा,

अर्थच बदलून गेला आता

माझ्या नजरेमध्ये प्रितीचा...!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy