अर्ध्यावरती डाव मोडीला
अर्ध्यावरती डाव मोडीला
किती सुंदर होतीस तू
जेंव्हा माझ्या जीवनात होतीस
आकाशात तेवणारी चांदनी जशी
चंद्रालाही हवी वाटावी अशी
तुझी माझी गट्टी होती !
चंद्रही हसत होता, तेंव्हा तुला पाहून
आयुष्याच्या क्षितिजावर जेंव्हा होतीस मला बिलगुन..
जीव होता माझ्यावर, सांगत होती जगास
का मालवली ज्योत, दिवा ठेवला तसास
सोबत असतीस तर,
साथ जीवनभर असतीस
खरंच! प्रेम केलंय तुझ्यावर,
झरा जसा निर्मळ
पण! लावले ग्रहण तुच प्रेमाला
मी तर तुझा साधा चंद्रमा
हेच कळत नाही, चुकलो कधी मी
साथ नव्हती द्यायची तर
हात का म्हणून पुढे केलास
का गं तु असा
प्रेमाचा डाव अर्ध्यावरती मोडीलास

