STORYMIRROR

SATISH KAMBLE

Romance Others

4  

SATISH KAMBLE

Romance Others

अनुभूती प्रेमाची

अनुभूती प्रेमाची

1 min
424

आहे तसा तो खूप लाजरा

असंख्य मुलींच्या त्याच्यावर नजरा,

अभ्यासात तो खूपच हुशार

म्हणूनच तो त्यांना आवडतो फार


मुली पाहूनी अवती भोवती

त्याच्या ऊरामध्ये भरते धडकी,

नयनबाण मारूनही त्याच्या

उघडत नाही दिलाची खिडकी


डेटिंगला त्याला नेण्यासाठी

तरूणींमध्ये चढाओढ फार,

कोणी घेऊन येते बाईक

तर कोणी मागविते कार


पण प्रेमाच्या जाळ्यामध्ये

कोणाच्याच तो अडकत नाही,

एकीच्याही प्रेमाची लाट

त्याच्या ह्रदयावर धडकत नाही


अचानक एका युवतीने

काॅलेजात त्या प्रवेश केला,

लोभसवाणे रूप पाहूनी

कलेजा त्याचा खलास झाला


तहानही गेली, भूकही गेली

तिचीच स्वप्ने पडू लागली,

हळूहळू प्रेमाची भाषा

नकळत त्याला कळू लागली


इतक्या सुंदर तरूणी त्याच्या

प्रेमासाठी आतुर होत्या,

किंतु त्यांच्या प्रेमाच्या ज्वाळा

त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या


त्या तरूणीच्या आगमनाने

मन त्याचे प्रफुल्लित झाले,

निखळ प्रेम हे असते काय

मनास त्याच्या कळू लागले


या घटनेतून असे उमगते

प्रेम नसे फक्त तनाची ओढ,

प्रेमाची अनुभूती होण्यासाठी

हवी असते मनाची जोड...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance