अंतर
अंतर
डोळ्यातील हसणे
डोळ्यांतच राहून गेले
तुडुंब भरलेल्या नदीचे
काठ कोरडेच राहिले
श्रावणात फुलली बाग
आंगण घराचे सुकून गेले
असे उघडे दार घराचे
छप्पर वार्याने उडून गेले
भरला कागद निळ्य शाईने
अर्थ शब्दांचे विरून गेले
गजबजलेले गाव माणसांनी
अंतर मनातील वाढत गेले
भरल्या तिजोऱ्या या पैशांनी
संध्यासमईचे दिप विझून गेले
मंदिरात रांगा भल्यामोठ्या
चेहरे देवाचे मात्र हरवून गेले
