अंधश्रद्धा...
अंधश्रद्धा...
अज्ञानाच्या विळख्यात जन
माझ्या देशाची लागली वाट
अंधश्रद्धेने हे मांडलयं ठाण
कशी होईल विकास पहाट||
ज्ञानसूर्यच ते होते सारे
दिव्य रश्मींची नव्हती वाण (उणीव)
बुवाबाजी खुपसून नाक
घातलं मातीत विज्ञान||२||
मुक्या जीवाचा दोष काय?
देह ग्रासला रे रोगाने जरी
बळी देता साध्य होईल का?
लाज बाळग या मनाची तरी||३||
मरीआई लेकरु देईलच कशी?
मानवा तुझ्या नवससायासाने
हे तर कधीचे जगा सांगून गेले
संतश्रेष्ठ तुकाही पोटतिडकीने||४||
ज्ञानज्योतीने प्रहार करू
बुरसटलेल्या विचारांवरी
विवेक जागवून अंतरीचा
जाग हे मनुजा आतातरी||५||
