अंधाऱ्या रातीला
अंधाऱ्या रातीला
चंद्र तारे खुश झाले
पाहून आपल्या भेटीला,
समई साक्षीदार आहे
कायम अंधाऱ्या रातीला...
गुलाबी ते चेहरा
मोत्या सम डोळे,
सुटता सुटेना आता
पिरतीचे कोडे...
नाकात नथनी
छान डुलते शोभते,
स्पर्श झाला जरी थोडा
जणू छुईमुई लाजते...
कपाळी सौभाग्याचं लेणं
कानात सोन्याचं झुंबर,
नव्हे स्वर्गातील अप्सरा
पाहून लाजे ग अंबर...
पायात चईन चांदीचे
तू चांदाची चांदणी,
चाले नाजूक साजूक
जसे राजनंदिनी...
लाले लाल ओठ
जसं डाळिंब पिकलेलं,
नजर पडताच तुझ्यावर
जिवंत होई पान सुकलेलं...
काळेभोर केस
त्यात माळीला गजरा,
सुगंध पसरे सर्वत्र
मग भिरभिरती नजरा...
रूप देखणं तुझं
साज शिणगार कशाला,
सुचता सुचेना आता
काय करावे आरशाला...

