STORYMIRROR

Datta Doke

Inspirational

4  

Datta Doke

Inspirational

अनाथांची माई

अनाथांची माई

1 min
373

अनाथांची माई दीनदुबळ्यांची आई

आमचेे काही चुकलेेे तर नाही 

आम्हा सोडण्याची का केलीस घाई

अनाथांना पोरके केलेस माई


अनाथांची नव्हती नुसती माय 

होतीस त्यांच्या दुधावरची साय

विनासायास दूध आम्ही कसे पाहू 

तुझ्याविना माई आम्ही कसे राहू


समाजासाठी तुझे विचार थोर 

अनाथांचा होतीस आधारवड

अनाथ लेकरांना घडविले थोर

जाण्याने तुझ्या हरवला आधारवड 


अनाथांसाठी केले कष्ट तू फार

पोरके लेकरू तुझा जीव की प्राण

कोणास केले डॉक्टर कोणी झाले इंजिनियर

सर्वांसाठी स्वर्ग आहे तुझेच चरण


समाजामध्ये मिळाला तुम्हा मोठा

त्याचा वाटला नाही तुम्हा अभिमान 

यातच दडलय तुमचे मोठेपण 

तुमच्या चरणी करतो मी नमन



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational