अनाथांची माई
अनाथांची माई
अनाथांची माई दीनदुबळ्यांची आई
आमचे काही चुकले तर नाही
आम्हा सोडण्याची का केलीस घाई
अनाथांना पोरके केलेस माई
अनाथांची नव्हती नुसती तू माय
होतीस त्यांच्या दुधावरची सायं
विनासायास दूध आम्ही कसे पाहू
तुझ्याविना माई आम्ही कसे राहू
समाजासाठी तुझे विचार थोर
अनाथांचा होतीस तू आधारवड
अनाथ लेकरांना घडविले थोर
जाण्याने तुझ्या हरवला आधारवड
अनाथांसाठी केले कष्ट तू फार
पोरकेे लेकर तुझा जीव की प्राण
कोणास केले डॉक्टर कोण इंजिनियर
सर्वांसाठी स्वर्ग आहे तुझेच चरण
समाजामध्ये मिळाला तुम्हा मोठा मान
त्याचा वाटला नाही तुम्हा कधी अभिमान
यातच दडलय तुमचे मोठेपण
चरणी तुमच्या करतो मी नमन
