STORYMIRROR

Datta Doke

Abstract

3  

Datta Doke

Abstract

अनाथांची माई

अनाथांची माई

1 min
186

अनाथांची माई दीनदुबळ्यांच आई

आमचेे काही चुकले तर नाही

आम्हा सोडण्याची का केलीस घाई

अनाथांना पोरकेे केलेस माई 


अनाथांची नव्हती नुसती तु माय

होतीस त्यांच्याा दुधावरची साय

विनासायास दूध आम्ही कसे पाहू

तुझ्याविना माई आम्ही कसे राहू


समाजासाठी तुझेे विचार थोर

अनाथांचा होतीस तू आधारवड

अनाथ लेकरांना घडविलेेस थोर

जाण्याने तुझ्या हरवला आधारवड


अनाथांसाठी केले कष्ट तू फार

पोरके लेकरू तुझा जीव की प्राण

कोणास केले डॉक्टर कोणा इंजिनियर

सर्वांसाठी स्वर्ग आहे तुझेच चरण


समाजामध्येे मिळाला तुम्हा मोठा मान

वाटला नाही त्याचा तुम्हा अभिमान

यातच दडलय तुमचेेे मोठेपण

तुमच्या चरणी करितो मी नमन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract