STORYMIRROR

Mangesh Medhi

Tragedy Others

3  

Mangesh Medhi

Tragedy Others

अनाथ

अनाथ

1 min
12.1K

तीला सारेच ठाऊक

तीच तर जाणते

तेवढ्याचे ऐवढे

तिनेच तर केले

जगण्यातली पहिली आणि..... मैत्रीण

जिच्यासाठी जिंकायचे होते जग सारे

जिच्या पायी ओतायचे होते सुख सारे

खुप मोठे व्हावे नाम कमवावे

मान सन्मान यश कीर्ती धन

सुख संपत्ती मज सारे मिळावे

एवढेसे एक होते स्वप्न जिचे

कष्टास माझ्या फळ येण्या आधी

यश शिखर सर करण्या आधी

स्वप्न साकार जगण्या आधी

सोडून ती गेली मज, अर्ध्यावरती

व्यर्थ वाटे आज सारे , भले जग जिंकले

झोळी माझी रितीच, ऐश्वर्य जरी लाभले

माते विन शून्य जगती जीवन अवघे सारे

एकाकी प्रवासी मी अनाथ तरीही

मुक वचन दिले तिज, दिला होता हसुन निरोप

चालत राहीन पुढे पुढे, राहीन आनंदी सदैव.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy