अलवार वाजवी पावा
अलवार वाजवी पावा
अलवार वाजवी पावा
अंतरी नाद हा घुमला
रोमांचित होई राधा
मोहवुनी कृष्ण गेला
नादमधूर वेणूचा
मनी स्पर्शतसे राधेला
ही मौनाची प्रेमभाषा
शिकवून कृष्ण गेला
चिंब ओली राधा
पिचकारीतुनी रंग भरला
आनंदतरंग गोकुळी
प्रेम रंगात रंगुनी कृष्ण गेला
प्रीतबंधनात परि ती मुक्ता
प्रेमवेडी राधा बाला
नवपरिभाषा स्त्री भक्तिची
गुंफूनी कृष्ण गेला
उन्मत्त भावनांचा
चहूकडे बाजार मांडलेला
अन् गुपित अमर प्रितीचे
सांगुनी कृष्ण गेला