Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

MEENAKSHEE P NAGRALE

Action Inspirational Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Action Inspirational Others

अहिल्यादेवी होळकर

अहिल्यादेवी होळकर

1 min
226


पुण्यश्लोक वीर । कुशल अहिल्या।

लढाया पाहिल्या । कितीतरी ।। १।।


कोवळ्या वयात । हाती तलवार।

सारा कारभार । सांभाळला ।।२।।


पराक्रमी सून । मल्हाररावांची ।

किर्ती ही शौर्याची । गाजवली ।।३।।


अजात हो शत्रू । केला जिर्णोद्धार।

बांधले मंदीर । कितीतरी ।।४।।


सा-या गावोगावी । घाट हो बांधले ।

पंच हो नेमले । अहिल्येने ।।५।।


सती नाही गेली । केवढा विश्वास ।

वाचा इतिहास । पराक्रमी ।।६।।


मिळेल हो उर्जा । समस्त स्त्रीयांना ।

हरवली ज्यांना । राघोजीना ।। ७।।


तिर्थक्षेत्र खास । केला हो विकास ।

नक्षी लय खास । मंदीरांची ।।८,।।


अयोध्या,नाशिक, । द्वारका,पुष्कर ।।

गया उदेपूर । नक्षी छान ।। ९।।


घाट, धर्मशाळा, । मंदीरे बांधले ।

जिर्णोद्धार केले । आहिल्येने ।। १०।।


ग्रंथसाठा मोठा । विद्वानांना मान ।

केला हो सन्मान । मोरोपंत ।। ११।।


त्याकाळात होती । राज्यात सुबत्ता ।

शांती समृध्दता । सुखसोयी ।। १२।।


धन्य ती आहिल्या । किती गावू गाथा ।

टेकविते माथा । मिनाक्षीचा ।। १३।।


Rate this content
Log in