अबोल प्रेम
अबोल प्रेम
गुपित प्रेमाचे लपवू नकोस
तुझ्या नजरेतून मी ते
वाचुन घेतलय
नको लपवूस ती हृदयाची हूरहूर
अन् मनीचा काहूर
तुझ्या हास्यातून मी सार ऐकुन घेतलय..
तुझ्या न बोललेल्या शब्दातून
लाजरं अबोल प्रेम
जाणून घेतलय..
जन्मोजन्मीसाठी तुला
मनातल्या मनात माझं
मानून घेतलंय...

