STORYMIRROR

Nilesh Jadhav

Romance

3  

Nilesh Jadhav

Romance

अबोल प्रेम

अबोल प्रेम

1 min
233

किती राहु अव्यक्त मी..

व्यक्त मला व्हायचय...

मनापासुनच मनातलं आज तुला सांगायचय...


तू ध्यास आहेस... 

जगू शकणार नाही तुजविन असा श्वास आहेस...

कसं सांगू तुला तू किती खास आहेस,

पावलोपावली जानवणारा आभास आहेस...


जगण्यासाठी तू श्वास होऊन जा..., 

पण कधी आस होऊ नकोस...

आहेसच तू माझ्यासाठी खास 

पण कधी भास होऊ नकोस....


तुझ्यामुळेच या कवितेला अर्थ आहे.., 

समजुन घेशील ना गं..?

नाहीतर मग शब्दंशब्द व्यर्थ आहे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance