अबोल नयन
अबोल नयन
भारावलो गं मी नयन तुझे पाहुनी
कटाक्ष तुझा आरपार हृदयी घुसला
भान माझे मला न राहिले गं सखे
नयनात तुझ्या जादूगर मज दिसला
होते अबोल तुझे नयन परि भाषा
तयांची मज कळून चुकली तू बघताच
पाणीदार काजळाने भरलेले नयन तुझे
संकेत भाषेचे वाटले मम नजरेत येताच
अबोल नयनात प्रीत काठोकाठ भरलेले
मोहून गेलो मी माझ्या डोळ्यांनी पाहता
भाव वेगवेगळे जाणले मी तुझ्या नयनात
करपल्लवीचे संकेत ओळखले मी बघता
तुझ्या अबोल नयनांनी केले मज वेडे
ध्यानी, मनी, स्वप्नी बघतो मी अबोल डोळे
आता नजरेला नजर भिडू दे फक्त एकदा
मग बघेन मजला लाऊनी डोळ्यात डोळे

