आयुष्य माझे तुला लाभू दे
आयुष्य माझे तुला लाभू दे
तूच माझा जीव, आत्मा, सर्वस्वच माझं
तूच माझं जीवन, मरण झुरते मी रोज...
प्रिया आज माझी तुझी होऊ दे रे भेट,
दिनरात झुरते पाहते चातकावानी वाट...
दिले होते आज मला, तू भेटीचे वचन,
वाट तुझी पाहती किती, माझे हे लोचन...
जळतो रे आत्मा माझा, या विरहात,
बसलास करुनी घर, माझ्या हृदयात...
सांग कधी घेशील, मला तू मिठीत,
आनंदून होईन वेडी, तुझ्या रे भेटीत...
किती वाट पाहू प्रिया, अंत नको पाहू,
अधीर झाले मन, नको दुःख मला देऊ...
कशी राहू एकटी मी, झुरत दिनरात,
प्रिया तुझा हात हवा, माझ्या रे हातात...
करशील तृप्त कधी, अतृप्त आत्म्याला,
क्षणोक्षणी झुरते मी, भेटायास प्रिया तुला...
तुझ्या मिलनाची मज, लागली रे आस,
तुझ्यासाठी थांबला प्रिया, माझा हा श्वास...
अशी कशी तू रे, जादू माझ्यावर केली,
तुझ्यासाठी कान्हा, राधा आतूर ही झाली...
आज तुझ्या मिठीत, झाले मी रे तुझी,
हौस सारी कर पुरी, प्रिया आज माझी...!
जगले तुझ्यासाठी आता, मज मरण येऊ दे,
आयुष्य माझं सारं, सख्या तुला लाभू दे...!

