STORYMIRROR

Sagar Autade

Abstract Inspirational Others

4  

Sagar Autade

Abstract Inspirational Others

"आयुष्य खेळ खेळतंय "

"आयुष्य खेळ खेळतंय "

1 min
22

"प्रेम हरवलं, आता घर पण दुरावतंय,

पैशांच्या शोधाने इतकं का हुरावलंय"..

"नोकरीच्या शोधात मी घर पण हरवलंय,

आयुष्याने जणू माझ्याशी खेळ खेळायच ठरवलंय."..

"काळाच्या ओघात दुरावत चालली नाती ,

की तुटत जातात जणू नात्यांच्या वाती"..

"हसू होतं जे ओठांवर ते अश्रूंनी धुवून गेलंय,

स्वप्नांनी का नात्यांला इतकं का पोरकं केलंय"..

"स्वप्नांना होती जी धडपड ती पायाखाली चिरडतंय,

आयुष्य जणू माझ्याशी खेळच खेळतंय" ..

"कोण विचारेल या मनाला काय हरवलंय,

सगळे जिंकूनही माझ मलाच मी हरवलंय "...


✍️ सागर ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract