"स्वप्नातील प्रेम"
"स्वप्नातील प्रेम"
1 min
317
तू स्वप्नात येशील, मी वाट पाहीन,
तुझं अस्तित्व, स्वप्नांत तरी राहील…
नसशील तू नशिबात, तरी मनात मी राहीन,
नकार तुझा असेल तरी, तुझे स्वप्न मी पाहीन…
येशील ना स्वप्नात माझ्या?
साथ इतकी तरी देशील ना?
तूला यायचं नाही हे मला ठाऊक होतं,
पण मनाला कसं सांगू, समजत नव्हतं…
स्वप्नं ती स्वप्नंच राहतात,
वेडं मन मात्र त्यांना सत्य मानत जातं…
✍️ सागर
