"हक्क नसलेली चांदणी"
"हक्क नसलेली चांदणी"
आज तिच्याशी नजरानजर झाली,
क्षणातच मन भरून आलं,
आणि नकळत पावलं मागे वळली.
हक्क नसलेल्या गोष्टींपासून
दुरच राहिलेलं कधी कधी जास्त योग्य ठरतं,
असं काहीसं हृदय पुटपुटलं...
ती मात्र, जणू पौर्णिमेच्या रात्रीची
झळझळीत चांदणी वाटत होती
साडीवर ती लख्ख चांडणीप्रमाने
उजळून निघाली होती,
चंद्राचीही बहुतेक तिला नजर लागावी!
असो...
चांदण्यांवर कधीच जमिनींचा हक्क नसतो,
त्या आभाळातल्या असतात,
जमिनीवर फक्त त्यांची आठवण उरते.
जरी मनातून वाटत राहिलं की,
ती नकळत एकदा तरी जवळ यावी,
तरीही हे अंतर... अथांग समुद्रासारखं... पार करता येणार नाही.
✍️ सागर

