STORYMIRROR

Sagar Autade

Others

4  

Sagar Autade

Others

"आठवणीतले बालपण "

"आठवणीतले बालपण "

1 min
415

आठवतं का तुला? ते चिमुकलं बालपण, 

निरागस हसू, स्वप्नांनि रंगलेलं आभाळपण…


पावसात भिजायचं, मातीमधले खेळ, 

शाळेच्या तासाला स्वप्नांच्या रेलचेल…


कागदी होड्या आता वाहून गेल्या, 

शाळेच्या बेलच्या आठवणी मनात भरून राहिल्या...


बालपणच ते जपायच तर खुप होत, 

पण स्वप्न पूर्ण करायच होत होऊन मोठं...


तुला सांगू? वेळ निसटून गेली हातातून, 

पण अजूनही जपतो मी त्या आठवणींना मनातून...


✍️ सागर


Rate this content
Log in