आठवणीतील पाऊस
आठवणीतील पाऊस
पाऊस हा आपल्या सारखाच
कधी खट्याळ कधी शांत
मनात गडगडाट आठवाचां
भेटण्याची ओढ कशी पडली भ्रांत
मला पाऊस खुप आवडायचा
मी पाऊसात भिजणारी परी
तुझ पाहण पावसात मला
अंगावर मी झेलताना सरी
तुझ्या प्रेमाच्या पावसात सख्या
मी कशी अंग अंग भिजले रे
नजर भिडता नजरेला तुझ्या
मनात प्रेम गालात लाजले रे
पावसात भिजण्याची भारी हौस
पहिल्या सरीचा दरवळला सुगंध
तुझ्या माझ्या मनाचे नाते
पाऊस मातीचे रेशीम बंध
आकाशात ढगाची दाटी होता
मन तसच कासावीस होते रे
येणार येणार वाट पाहुण तुझी
जवळ येता हुलकावणी देतो रे

