STORYMIRROR

vaishali vartak

Romance Tragedy

2  

vaishali vartak

Romance Tragedy

आठवणीत तुझ्या

आठवणीत तुझ्या

1 min
16

तेच तेच पान पुन्हा

वाचतेय अनेक वेळा

परि तुझ्या आठवांनी

कंठ दाटून आला गळा


जातांना तूच दिलेले फूल

अजूनही जपून ठेवियले

येता आठवण तुझी

अश्रू पडूनी ते ओलावले


माझी व्यथा पाहूनिया

गुलाब पण हिरमुसला

पाकळी पाकळी तयाची

जणु हळुवार कोमेजला


वाचन हे निमित्त मात्र

पान हलत नाही एक

तव आठवात मन

रमते विचारात अनेक.


कधी संपेल हा काळ

करमेना क्षणभर मला

परतूनी तू ये ना जवळी

हेच सांगणे माझे तुला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance