आठवणींच्या हिंदोळ्यावर
आठवणींच्या हिंदोळ्यावर
मलाही आज झुलायचय
आठवणीच्या हिंदोळ्यावर,
मजा येईल खरी सजनी
सोबत तू असशील तर.
विसरून जावू जीवन दुःख
सुखाचे सारे मोजू क्षण,
देऊघेऊ आनंदी आनंद,
जीवनाचं करूया सोनं.
आठवणीच्या हिंदोळ्यावर
मला हवी तुझीच साथ,
दोघेच या जीवनात सदा
दोघेच नित्य सुखदुःखात.
मी किती गाऊ गुण तुझे
तुला काय सांग हवे,
तुला देतो चार झोके
तू ही मला चार झोके दयावे.
येती साऱ्याच आठवणी
झाला आनंद मज फार,
झुलायचे दोघे आपण
आठवणीच्या हिंदोळ्यावर.