आठवण येईल का
आठवण येईल का
तूला माझी कधीतरी
आठवण येईल का
माझ्या स्मृतीत तूला तुझं
मन नेईल का || 0 ||
कुरवाळतोय मी
तुझ्या प्रत्येक स्मृतीला
साठवलंय नजरेत तुझ्या
प्रत्येक कृतीला
माझं प्रेम तुझं मन
मिठीत घेईल का
माझ्या स्मृतीत तूला तुझं
मन नेईल का || 1 ||
तुझ्याकडून संमती मिळावी
ही आशा
कळेल तुला कधी का
माझ्या हृदयाची भाषा
मला होकाराची कधी
साद देईल का
माझ्या स्मृतीत तूला तुझं
मन नेईल का || 2 ||