STORYMIRROR

Supriya Gotekar

Inspirational

4  

Supriya Gotekar

Inspirational

आठवण शहिदांची

आठवण शहिदांची

1 min
472

१०० वर्ष करून गुलामी

स्वअस्तित्व कळले रे

छातीवरती पाय देऊनी

विलायती कुत्रे भुंकले रे 


व्यापाराचा बहाणा करूनी

घुसखोरी केलीस तू

भारत मातेच्या चिरंजीवांना 

वीर गतीला लावलेस तू


भेटेन नऊ महिन्याने

भगतसिंगांचे शब्द झाले खरे

महात्माजींच्या सहकार्याने

वाहू लागले स्वातंत्र्याचे वारे


मंगल पांडे बाबू गेनू

सुभाषचंद्र मुकला रे 

कालीचा तो अवतार घेऊनी

राणी लक्ष्मी लढली रे


मर्दा तू तोड गुलामीची चाकोली

कास स्वातंत्र्याची धरली रे

कोटी-कोटी प्रणाम वीरांना

गोरे पळवून लावले रे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational