STORYMIRROR

Supriya Gotekar

Romance

3  

Supriya Gotekar

Romance

नकळत

नकळत

1 min
165

न पाहिले कधी मी तुला

न कधी तु मला पाहिले

स्वप्नात येता सख्या माझ्या

अंग अंग हे शहारले


गुलाबाच्या कळीप्रमाणे

हास्य तुझे बहरूनी आले

नकळत स्वप्नातील स्पर्शाने

मन माझे उतावीळ झाले


शृंगार तुझा तो पाहुनी सख्या

हृदय भारावूनी गेले

स्वप्नातील राजकुमारा

मी तुझी स्वप्नरूपी राजकुमारी झाले


तुझे ते स्मितहास्य

चंद्राला लाजवेल अशे होते

आणि तुझे ते टपोर डोळे

लुकलुकत्या ताऱ्याप्रमाणे होते


प्रणयाला आली जाग

फुलवी सुगंधी बाग

माझ्या मुसमुसल्या चेहऱ्याचे

सख्या तु ओळखले भाव


तुझं नटलेलं रूप पाहून

वाटतं तुला मिठीत घ्यावं

प्रिय सख्या जवळ ये ना

तुझ्या रेशमी मखमली मिठीत घेना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance