आता कुणी नाही
आता कुणी नाही
जीवात जीव नाही
पळत असतो सदा
अनुभवत नवं
सोडून चालते जून
कसा हा निर्वाळा
परिवर्तवून जातो
बांधत आपले स्वप्न
पुन्हा नवीन बघतो
जगल्या आठवणी
अभिनय करून
रमलेला नेहमी
विसरून काळात
फिरतो वाऱ्यावर
ढगा सारखा थांबत
कर्म पाऊस पाडतो
मन प्रीतीत आणून
खुलवत कळी
वली फुलांची अशी
बोलवते पाखरू
गंध दरवळून
मग प्रेम करतो
ठेवून तो जीवाला
गुंफत बीज धागा
नवं पुन्हा येण्यास
जीवात जीव नाही
