आहे ती वेळ जगून गाजवून जाऊ
आहे ती वेळ जगून गाजवून जाऊ
घे बोलून चार गोष्टी
काही तु सांग
काही माझे ऐकून घे
उद्याचा काय भरोसा
जगलो त्या क्षणात
पहिल्या वहिल्या भेटीत
तु लाजली मनानं
मी ही ह्र्द्यानं धडधडलो
नवं ताज नवसार
सर्वचं बाबती कसा तो
काळ आपला उत्सुकतेनं
अंग अंग बहरून गेला
कधी तुझं प्रेम मला
कधी माझं प्रेम तुला
बारबार विचारत असे
तु खुश आहेस ना
त्याप्रमाणे दोन्ही रमले
घेऊन एकमेकांची काळजीत
आता काय असं थोडं वेळेत
पुन्हा जगता तं येणार नाही
पण जाता जाता येऊ पुन्हा जीवात
चार प्रेम बोलात जवळ तरी येऊ
गेलं ते जग आपलं
परत एकदा आठवू
घे जगून चार गोष्टी
जाणार तु जाणार मी
सोडून हे जग सारं
विसरून ये मग जीवातल्या जीवात
प्रेम सहवासात विदा झालो तर
रडू नको तु, रडणार नाही मी
अखेर पण आनंदाने जाऊ
प्रेमानेचं प्रेम देतो देव
आहे ती वेळ जगून गाजवून जाऊ
काही माहित मेल्यानंतर कुठं जाऊ?
