आरसे परकेच झाले
आरसे परकेच झाले
रोज निहाळणारे आरसे परकेच झाले
काय बोलू तू अन ते एक सारखेच झाले
मी कोणाशी रोज भांडत बसू तुझ्यासाठी
आज कसे काळजावरचे ओझे हलकेच झाले
कवितेला सजवायचो रोज तू येशील म्हणून
शब्दांचा गुंता वाढतं गेला अन भलतेच झाले
वागणार होतीस दुसोट्या सारखं माझ्याशी
एव्हढ्या दिवसांनी जरासं कळतेच झाले
विषय असतो विरहाचा काव्यात माझ्या रोज
मोजमाप प्रेमाचे करताना जरा कलतेच झाले

