आरोग्यम् धनसंपदा
आरोग्यम् धनसंपदा
धनसंपदा
लाभे आरोग्याची
धरता योगाची
कास सर्वदा
योगाभ्यासाने
शरीरास बळ
मना पाठबळ
मिळे नेमाने
तनामनाचे
आरोग्य उभारी
आजारही हारी
पुढती याचे
मोकळी हवा
आरोग्याचा मंत्र
जाणा हेच तंत्र
जपी गारवा
आहार सदा
संतुलित घ्यावा
हा नेम पाळावा
जसा कायदा
या सारेजण
मिळून ठरवू
योगास रुजवू
करुया प्रण