STORYMIRROR

Anil Kulkarni

Tragedy

3  

Anil Kulkarni

Tragedy

आपत्ती

आपत्ती

1 min
258

सगळ्याच आपत्तीं

माणसांना छळतायेत

नुसताच पापाचा घडा भरला 

की आयुष्य आता संपत नाही

फुप्फुस भरलं की सगळंच संपतं

आयुष्य उध्वस्त करायला

यमाने ही उघडलीय 

महाविकास आघाडी

वादळ, विषाणू

 हेच आहेत आता 

मृत्यूचे सुकाणू

बंदिस्त झाले आता परमेश्वर

रेमडिसीवर,ऑक्सीजनसिलेंडर

 व्हेंटिलेटर हेच आता 

जीवनाचे तारणहार

मृत्युनंतर चार खांदे 

आता लागत नाहीत

प्लॅस्टिकमध्ये प्रेत नाही

संस्कृती गुंडाळली जातेय.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy