आणि नियती कधीच नाही बदलत
आणि नियती कधीच नाही बदलत
जो रडू इच्छितो
पण रडू नाही शकत.
जो काही सांगू इच्छितो
पण सांगू नाही शकत.
ज्याला नाराज व्हावं वाटत
पण तोच सर्वांचे मन राखत फिरतो.
जो लोकांमध्ये असूनही
एकटाच असतो.
जे नाही बोलायचं असतं तेच
चार चौघात बोलून देतो.
चूक नसली तरी
अपराधी समजला जातो.
हीच माझी नियती आहे
आणि नियती कधीच नाही बदलत.
