प्रश्न
प्रश्न
बरे झाले तू बोलणे बंद केले
मी माझ्या घरी परत निघालो
आता येणार नाही तुला प्रश्न माझा
तू कोणते ही आता उत्तर देवू नको
माझे आभाळ तुला देतो
तुझा दुष्काळ मला दे
शोधू नको माझी सावुली कुठे
निरोप शेवटचा आता आनंदात दे
सांगू नको बहाणे कोणतेच
मला तू विसरनारच होती
किती तळमळली माझी राञ
मला तुझी आठवण छळत होती
अनुत्तरित राहू दे माझा प्रश्न
तुझे उत्तर मला कळाले
प्रेम नसले तरी तू सोबत हवी होती
आयुष्याचे अन् मृत्यूचे अंतर कळाले

